Click here to go back
बाप्पा येतोय...
Image of a calender
September 10 , 2021
Logo of a Customer
आदित्य चव्हाण
Image of a man working on his laptop

बाप्पा येतोय... असे म्हणताच बाप्पांच्या कार्यक्रमासाठी वर्गणी गोळा करतानाची गडबड, सजावटीची तयारी आणि वाजत-गाजत बाप्पांच्या आगमनाच्या वेळी ढोल पथकांसोबत नाच-गाणी करत मिरवणूकची वेगळीच घूम असते. पावसाळ्यामुळे हिरवगार रान, बहरलेलं निसर्ग हे सर्व बघून मनामध्ये जो आनंद निर्माण होतो त्याहून अधिक जास्त बाप्पांच्या आगमनामुळे मनात उत्सुकता येते. वर्गणी जमा झाली की सजावटीला, स्वागताच्या तयारीला सुरुवात होते. सगळीकडे नुसती एकच घाई कोणाची मूर्ती सगळ्यात उंच, कोणाचा देखावा सर्वात भारी, कोणाच्या मंडळाला कोण प्रमुख पाहुणे येणार आणि असे बरेच काही. यामध्ये गावातील अनेक मंडळांमध्ये स्पर्धा सुरू असते. गणेश चतुर्थी पर्यंत सजावट व इतर तयारी पूर्ण करुन श्री गणेशांची शाडू मातीची मूर्ती आणतात व तिची स्थापना करतात. सर्व देवांमध्ये गणपती बाप्पांना महत्त्वाचे स्थान देण्यात आल्याने त्यांना प्रसन्न करण्यासाठी चतुर्थीचे उपवास आणि त्यांच्या आवडत्या गोष्टींना विशेष प्राधान्य देण्यात येते. लहान लहान मुले स्लो-सायकलिंग रेस, लिंबू चमचामध्ये धूम मजा करतात. त्याचबरोबर प्रत्येक मंडळाच्या बायांमध्ये गरबाची स्पर्धा सुद्धा सुरू असते. जबाबदारीमुळे कोणाचे ११ दिवस टेन्शनमध्ये तर कोण किती धूम मजा करेल याचा सुद्धा अंदाज नसतो. अशाप्रकारे गणपतीबाप्पा सोबत ११ दिवस खूप धमाल मस्तीने जातात.
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना युवा मराठी तर्फे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!